ग्रामपंचायत सुरुल येथे संत गाडगेबाबा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय तपासणीेसाठी – अहवाल
Updated: Dec 22, 2025
ग्रामपंचायत सुरुल, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे राबविण्यात येत असलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची तपासणी यशस्वीरीत्या पार पडली. सदर तपासणीदरम्यान समितीने गावातील स्वच्छता व्यवस्था, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणीपुरवठा, वृक्षलागवड तसेच जनजागृती उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
तपासणी समितीसमोर ग्रामपंचायत सुरुलने अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली. नियमित स्वच्छता मोहिमा, लोकसहभागातून गाव स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न, शालेय व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची नोंद समितीने घेतली. जिल्हास्तरीय समितीने ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक करत पुढील काळातही हीच सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.
संत गाडगेबाबा अभियानामुळे सुरुल गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनत असून ग्रामपंचायत सुरुल ग्रामविकासाच्या दिशेने प्रभावीपणे कार्यरत असल्याचे या तपासणी अहवालातून स्पष्ट होते.

Comments